शिरूर च्या आनंद पतसंस्थेच्या अध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा

तब्बल सोळा कोटी रुपयांची अफरातफर; गुंतवणूकदारांची फसवणूक
Crime against Chairman and 14 others of Anand Credit Union
आनंद पतसंस्थेच्या अध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हाFile Photo
Published on
Updated on

शिरुर : १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपयांच्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केल्याप्रकरणी आनंद नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभयकुमार चोरडिया यांच्यासह व्यवस्थापक व अन्य १४ लोकांच्या विरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची माहिती

या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. या बाबत शिरुर पोलीसांनी दिलेली माहीती पुढीलप्रमाणे : 31 डिसेंबर 2013 ते दि. 20 फेबृवारी 2020 या कालावधीमध्ये शिरुर, (ता. शिरूर, जि. पुणे) येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये अभयकुमार पोपटलाल चोरडिया (अध्यक्ष)आणि इतर त्यांचे साथीदार प्रविण चंपालाल चोरडीया, मुरसलीन वहिंद मोहमद, सनी धरमचंद चोरडीया, सविता अभयकुमार चोरडिया, सुजाता नितीन चोरडिया, प्रितम प्रविण चोरडिया, श्रीमती पारसबाई पोपटलाल चोरडीया, चंपालाल बुधमल चोरडिया, सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडिया, शांताराम गंगाधर देवकर, (संस्था व्यवस्थापक) या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, , अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात व फसवणूक केली आहे.

अशी केली अफरातफर

तसेच श्रीमती सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल , नागेंद्र एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक अजय एच. सोरटे , प्रमाणित लेखापरीक्षक यांनी संगनमत करून वरील कालावधीत स्वंत :च्या फायदयाकरीता पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम ही स्वतःचे फायदयासाठी आपल्याच फर्मच्या नावे कर्जाचे वितरण करून ठेवीदारांच्या रु. 16,70,54,361/- (अक्षरी रुपये सोळा कोटी सत्तर लाख चोपन्न हजार तीनशे एकसष्ट फक्त) एवढ्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. वरील 14 लोकांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा तपास पोलीस उपनिरिक्षक मुजावर करीत आहेत .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news