क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईने जीवन संपवले

स्वतःचा गळा चिरून घेतला ; शहरातील प्रभात रस्त्यावरील घरातील घटना
salil ankola
सलिल अंकोला Pudhari
Published on
Updated on

क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माला अशोक अंकोला (वय 77, रा. प्रभात रस्ता) असे त्यांचे नाव आहे. माला अंकोला या प्रभात रस्त्यावरील घरात एकट्याच राहात होत्या. शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरी काम करणारी महिला आली. त्यांच्या रूमचा दरवाजा बंद होता. त्यांनी बराच वेळा आवाज दिला तरी, आतून दरवाजा उघडली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा माला अंकोला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. माला अंकोला यांनी स्वत:च गळा चिरून घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news