सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

31 डिसेंबर 2024 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचे शासनाचे आदेश
Elections of Co-operative Societies
सहकारी संस्थांच्या निवडणुकाpudhari
Published on
Updated on

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिनांक 1 ऑक्टोबरपासून सुरु केलेल्या 29 हजार 429 सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर केला. त्यामध्ये राज्य सरकारने सोमवारी (दि.7) सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करुन 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश जारी केले आहेत. म्हणजेच सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर पडल्या आहेत.

प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांपैकी 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र, राज्यातील 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

आदेशात असेही नमूद केले आहे की, विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुक पुर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना सहकार विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळेही राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलणे उचित होईल, अशी शासनाची धारणा झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news