निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत वाद

महाविकास आघाडी : अंधारेंच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे नाराज
Election
निवडणुकpudhari
Published on
Updated on

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करत माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप पूर्णपणे ठरले नाही. त्यात हडपसर जागेचा पेच देखील सुटला नाही. मात्र, त्याआधीच सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून, सुषमाताई त्या बैठकीत होत्या का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघातून महादेव बाबर यांना उमेदवारी जाहीर केल्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. त्यावर सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? असा सवाल सुळे यांनी केला. माझ्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. तरी मी त्यांना एकदा फोन करून विचारेन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना लगावला.

सुळे म्हणाल्या, मी एक जबाबदार खासदार आहे. जागावाटप फायनल होईपर्यंत मी आउट ऑफ लाइन बोलणार नाही. महाविकास आघाडीत गैरसमज होईल असे वक्तव्य मी करणार नाही, असेही सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी हडपसर हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून, या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणताही मनमुठाव नाही, सगळ्याच जागांवर एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लीअर झाली असून, आता केवळ 15 ते 18 जागांवर चर्चा सुरू आहे. हडपसर मतदारसंघात 2019 मध्ये काय चित्र होते? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्या वेळी युतीमधील जागावाटपात हडपसरची जागा भाजपला सुटली होती, तर आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. हडपसर मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी भाजपचे योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केल्याने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीत ही जागा खरेच ठाकरे गटाला सुटली का? असा सवाल सुषमा अंधारेंच्या घोषनेनंतर उपस्थित झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news