Online Electricity Bills: घरबसल्या ऑनलाइन बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल

बारामती परिमंडलात 75 टक्के प्रमाण
Online Electricity Bills
घरबसल्या ऑनलाइन बिल भरण्याकडे ग्राहकांचा कलPudhari
Published on
Updated on

बारामती: महावितरणच्या बारामती परिमंडलात टेक्नॉसॅव्ही ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या काळात वीज ग्राहक ऑनलाइन बिल भरण्याकडे वळू लागला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बँका, पतसंस्थांच्या वीज बिल केंद्राकडे नागरिक आता पाठ फिरवू लागले आहेत. विशेष म्हणजे यात शहरी ग्राहकांबरोबरच ग्रामीण वीज ग्राहकसुद्धा मागे राहिलेला नाही. ग्रामीण भागातही ऑनलाइन वीज बिल भरण्याचा मार्ग ग्राहकांनी निवडला असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने कितीही रकमेचे वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्याची कार्यपद्धती महावितरणच्या वेबसाइटवर दिलेली आहे.

डिजिटल इंडियाच्या वाटचालीत आता महावितरणचे वीजग्राहकही मागे राहिलेले नाहीत. महावितरणच्या बारामती परिमंडलातील 11 लाखांहून अधिक ग्राहकांनी जानेवारी महिन्यात घरबसल्या ऑनलाइन पध्दतीचा वापर करीत वीज बिल भरले आहे. त्यामुळे ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचले आहेत शिवाय बिलात 0.25 टक्के सवलतही मिळाली.

ग्राहकांना क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत त्यांचे वीज बिल भरता येते. 5 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असणार्‍या सर्व लघू दाब ग्राहकांना आरटीजीएस, एनइएफटीद्वारे बिल भरता येते.

क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीज बिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. तसेच ऑनलाइन पेमेंटला बिलाच्या रकमेच्या 0.25 टक्के इतकी सवलतदेखील देण्यात आलेली आहे. वीज बिलांचे ऑनलाइन पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-2007 च्या तरतूदी लागू आहेत.

वीज बिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच मपेमेंट हिस्ट्रीफ तपासल्यास वीज बिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

विविध अ‍ॅपद्वारे वीज बिलाचा भरणा

बारामती परिमंडलात डिसेंबर महिन्यात सुमारे 15 लाख 35 हजार ग्राहकांनी वीज बिल भरणा केला. त्यात ऑनलाइन बिल भरणार्‍यांची संख्या सुमारे 11 लाख 47 हजार म्हणजेच 74.78 टक्के इतकी आहे. बँक अथवा केंद्रात जात सुमारे 3 लाख 86 हजार ग्राहकांनी भरणा केला. हे प्रमाण 25.22 टक्के आहे.

जानेवारीत सुमारे 15 लाख 76 हजार ग्राहकांनी बिल भरले. त्यात ऑनलाइन माध्यमांद्वारे 11 लाख 77 हजार म्हणजेच 74.72 टक्के ग्राहकांनी बिल भरले, तर अन्य मार्गाने 3 लाख 98 हजार म्हणजेच 25.28 टक्के ग्राहकांनी बिलाचा भरणा केला. फोन पे, गुगल पे अशी साधने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असल्याने हे शक्य होऊ लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news