Pune News: चौथ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू; हडपसर भागातील घटना

बांधकाम ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News
चौथ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू; हडपसर भागातील घटना File Photo
Published on
Updated on

Hadapsar construction site death news

पुणे: चौथ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळमध्ये घडली. अपघाताला जबाबदार ठरल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजू सोपान अवचार (वय 43, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, हडपसर- सासवड रस्ता) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

याबाबत अवचार यांचा मुलगा कृष्णा यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेला जबाबदार ठरल्याप्रकरणी स्वप्निल बनकर (वय 30), रघुनाथ खोपकर, संतोष राठोड (वय 30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अवचार हे बांधकाम मजूर होते. हडपसरच्या काळेपडळ परिसरात एका इमारतीचे बांधकाम चालू आहे. अवचार या ठिकाणी चौथ्या मजल्यावर काम करत होते. (Pune Latest News Today)

Pune News
Pune: महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना आयुक्तांचा दणका; दोन पगारवाढ थांबवली

चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने अवचार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अवचार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

सुरक्षा साधने न दिल्याने दुर्घटना

बांधकाम मजूर अवचार यांना हेल्मेट, पट्टा अशी सुरक्षाविषयक साधने न दिल्याने, तसेच पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news