खडकवासला विधानसभेवर काँग्रेस, शिवसेनेचा (उबाठा) दावा

महाविकास आघाडीत चढाओढ सुरू; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तयारी जोरात
All parties are focusing on Khadakwasla constituency
सर्वच पक्षांचे लक्ष खडकवासला मतदारसंघावर खिळून आहेFile Photo

वेल्हे : महाविकास आघाडीच्या जागावाटपात खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने (उबाठा) खडकवासला विधानसभेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे.

Summary

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असून, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे लक्ष खडकवासला मतदारसंघावर खिळून आहे. कॉँग्रेसच्या मते ह्या मतदारसंघात कॉँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे, तर शिवसेनेने (उबाठा) इथे महायुतील रोखण्यात जीवाचे रान केले आहे, अशा प्रकारची विधानं कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहेत.

कॉँग्रेसचाही निर्धार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या पुढाकाराने खानापूर (ता. हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या बैठकीत खडकवासला लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. बारामती लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल मते आदी उपस्थित होते.

All parties are focusing on Khadakwasla constituency
'टी- ट्वेंटी'प्रमाणे महायुती विधानसभा जिंकणार : देवेंद्र फडणवीस

'खडकवासला मध्ये कॉँग्रेसचा पारंपरिक मतदार'

श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. या मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक मतदार अधिक आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने काँग्रेसचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ देण्यात यावा.

'शिवसेनेचा मोलाचा वाटा'

दरम्यान, नर्‍हे (ता. हवेली) येथे शिवसेना (उबाठा) खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी खडकवासला लढण्याचा निर्धार केला. बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्यात शिवसेनेने जिवाचे रान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे विजयी झाल्या, असे शिवसेना पदाधिकार्‍यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीत शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब मोकाशी, विधानसभाप्रमुख नितीन वाघ, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, हवेली तालुकाप्रमुख तानाजी पवळे, विलास मते, गोकूळ करंजावणे, श्याम मोरे, बुवा खाटपे, महेश पोकळे, रवी मुजुमले, अतुल दांगट, सचिन पासलकर, संदीप मते, संतोष गोपाळ, महेश मते, वैभव हनमघर, विजय कोल्हे, योगेश पवार, आदित्य बांडे हवलदार आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news