

Congress election strategy meeting Pune
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन येत्या दि. 11 व 12 ऑगस्टला पुण्यात होणार आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यातील अनेक काँग्रेसच्या नेते मंडळीनी भाजपची वाट धरली असतानाच पुण्यात होत असलेल्या या अधिवेशनात कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह आणण्यासाठी नक्की काय निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. (Latest Pune News)
काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर गत आठवड्यात प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन सिंहगड रस्त्यावरील गोर्हे बु. या गावामधील एका खासगी रिसॉर्टमध्ये होणार आहे. प्रामुख्याने आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायती समिती, नगरपरिषदा यांच्या निवडणुका होणार आहेत.