पुणे: ‘समर्थ भारत, सक्षम सेना’ या प्रेरणादायी थीमअंतर्गत ‘नो युवर आर्मी मेळा 2025’ या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तीन दिवसांत सुमारे अडीच लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला. कॅम्प भागातील रेसकोर्स मैदानावर भारतीय लष्कराच्या वतीने तीन दिवस भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
यात अत्याधुनिक लष्करी साहित्य पाहता आले. याचे 3 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर हे प्रदर्शन सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. 3 ते 5 जानेवारी या कालावधीत सुमारे दोन लाख 65 हजार नागरिकांनी पाहण्याचा आनंद लुटला.
रोबोटिक डॉग पाहून हरखली मुले
रोबोटिक डॉग, वज्र, हवाई संरक्षण प्रणाली पाहून लहाने मुले हरखून गेली. तसेच, लष्करी जवानांनी या वेळी घोडेस्वारीसह विविध प्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. पाइप बँड, आर्मी मार्शल आर्ट्स, आर्मी डॉग डिस्प्ले, अश्वारूढ संघाद्वारे तंबू पेगिंग यासह नृत्य, शिखांचे गटका नृत्य, मल्लखांब आणि कलरीपयट्टू याचा यात समावेश होता.