पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांना महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच दणका दिला आहे. ही गावे वगळून त्यांची नगरपरिषद स्थापन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांनी तो डावलून हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेत ऑक्टोबर २०१७ मध्ये उरुळी देवाची, फुरसुंगीसह ११ गावांच्या समावेशाचा निर्णय तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने घेतला. मात्र, शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेतून येऊनही या गावांना सुविधा मिळत नसल्याने ही गावे पालिकेतून वगळावीत आणि त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करावी, अशी मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नगरविकास विभागाला त्यासंबधीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाने कार्यवाहीला सुरवात केली होती. मात्र, त्यावेळेस विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी उरुळी देवाची आणि फुरसुंगीला पालिकेतून वगळण्यास विरोध दर्शविला. स्वतः
अजित पवार यांनी गावे वगळण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, त्यानंतर शासनाने ३१ मार्च २०२३ ला या गावांची नगरपरिषद स्थापन करण्याबाबत इरादा जाहीर करत त्यावर हरकती-सूचना मागविल्या होता. दरम्यान गतवर्षी जुलै महिन्यात अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यामुळे पुण्यासंबंधीचे सर्व निर्णय त्यांच्या मर्जीन घेतले असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, असे असतानाच ऐन विधानसभ निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उरुळी देवाची व फुरसुंगी य गावांना पालिकेतून वगळून त्यांच स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची अंतिम अधिसूचना काढली. त्यामुळे पवारांसाठी हा मोठा धक्का मानल जात आहे. महायुती सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेनेने थेट राष्ट्रवाद काँग्रेसवर यानिमित्ताने कुरघोडी केल असल्याचे स्प आहे. ष्ट होत आहे.