पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

लष्कर, दांडेकर पूल, विश्रांतवाडी परिसराचा समावेश
Pune News
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलPudhari News
Published on
Updated on

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 14 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी या भागातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

या भागातून जाणार्‍या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहांगीर रुग्णालयामार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून माल धक्क्याकडे जाणार्‍या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहांगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येमार आहे. या भागातून जाणार्‍या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जावे, बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात मोठ्या संख्येने जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या भागातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

ससून रुग्णालयात जाणार्‍या वाहनांसाठी प्रवेश

ससून रुग्णालयात जाणार्‍या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहेत. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहने लावण्यासाठी व्यवस्था

या भागात येणार्‍या अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून कॉलनी येथे लावावीत.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल

दांडेकर पूल परिसरातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणार्‍या वाहनांनी सारसबाग, कल्पना हॉटेल, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी रस्ता, आशा हॉटेल चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनचालकांनी आशा हॉटेल चौकमार्गे दत्तवाडीत यावे. तेथून इच्छितस्थळी जावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news