

How to apply for caste validity certificate in Maharashtra 2025
शिवाजी शिंदे, पुणे
उच्च आणि अतिउच्च शैक्षणिक प्रवेशासाठी अत्यंत महत्वाचे असलेले जात पडताळणी आता लवकारात लवकर मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यानुसार मे आणि जून या दोन महिन्यात सुमारे 94 हजार अर्ज दाखल झाल होते. याच कालावधीत 60 हजाराहून अधिक प्रमाणपत्र निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित प्रमाणपत्रे देण्यासाठी प्रक्रीया ऑनलाईन सुरू असून, ती देखील येत्या दहा दिवसात निकाली काढण्यात येणार आहेत.
एस.सी/एस.टी. बरोबरच ओबीसी, एन.टी. या प्रवर्गासह इतर जातीमधील विद्यार्थ्यांना उच्च आणि अतिउच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची अत्यंत गरज असते किंबहुना या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक फी मध्ये सूट मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र बार्टीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले.
राज्य शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये प्रमाणपत्र काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागत लावण्याची गरज पडत नाही.
अर्ज दाखल केल्यानंतर (ऑनलाईन) केवळ 15 ते 90 दिवसांच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होते. मात्र कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास मात्र, संबधित अर्जदारास समिती मूळ कागपत्रासह तपासणीसाठी बोलविणात येते.
-मूळ जात प्रमाणपत्र:
-सक्षम अधिकार्याने दिलेले मूळ जात प्रमाणपत्र.
-शाळा सोडल्याचा दाखला:
-अर्जदाराचा किंवा वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
-शाळेतील प्रवेश निर्गम उतारा:
-अर्जदाराचा किंवा वडिलांचा शाळेतील प्रवेश निर्गम उतारा (मूळ प्रत) किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत.
-जातीचा पुरावा:
-एस.सी./एस.टी.: 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा जातीचा पुरावा.
-ओबीसी/एन.टी: 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा जातीचा पुरावा.
-1967 पूर्वीचा पुरावा:
-अर्जदाराच्या किंवा वडिलांच्या वंशावळीतील सदस्याचा 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा (ओबीसी/एसबीसी प्रवर्गासाठी).
-वंशावळ:
-अर्जदाराची वंशावळ (वडिलांच्या बाजूकडील -नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र आणि त्यांचे अर्जदाराशी असलेले नाते नमूद करणे आवश्यक).
रहिवासी दाखला:
-अर्जदाराचा रहिवासी दाखला.
-ओळखपत्र:
-अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही -ओळखपत्र.
-शपथपत्र:
आवश्यक असल्यास, विहित नमुन्यात (उदा. नमुना ’फ’) शपथपत्र.
-इतर कागदपत्रे:
आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे, जसे की वडिलांच्या बाजूकडील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 7/12 चा उतारा, इत्यादी.
-जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, प्रथम अधिकृत संकेतस्थळावर किंवा सेतू केंद्रात अर्ज करावा लागतो.
अर्ज करताना, वरील सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे जोडावी लागतात.
-अर्ज केल्यानंतर, जात वैधता प्रमाणपत्र मिळायला 15 ते 90 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
तुम्ही तुमचा अर्ज ’आपले सरकार’ पोर्टलवर किंवा इतर संबंधित पोर्टलवर ऑनलाइन देखील तपासू शकता.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामासाठी जात पडताळणी प्रमाणपत्रांची अत्यंत गरज असते. ही बाब लक्षात घेऊन हे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सुनिल वारे- महासंचालक बार्टी
राज्यातील 29 जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे अधिकारी मार्च महिन्यापासूनच रूजू झाले आहेत. केवळ नंदुरबार, हिंगोली,वाशिम,गोंदिया,जालना या जिल्ह्यातील जात पडताळणी समितीवर अधिकारी अजुनही रूजू झालेले नाहीत. मात्र या जिल्ह्यांच्या अतिरिक्त कार्यभार शेजारी असलेल्या जिल्ह्यांच्या समितीच्या अधिका-याकडे़ देण्यात आलेला आहे. असे असले तरी जात पडताळणी प्रमाणपत्रांची कामे व्यवस्थित सुरू आहेत.