मंचर: मंचर एसटी बसस्थानकासमोरील निवारा लॉजसमोर रविवारी (दि. 13) एक धक्कादायक घटना घडली. लॉजमध्ये राहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या कारवरील ताबा सुटल्याने ती थेट लॉजच्या पायर्या उतरून व्यावसायिक गाळ्याजवळ अडकली, मात्र मोठा अपघात टळला.
एमएच 06 बीयू 0891 या क्रमांकाची कार भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची होती. रात्री दर्शन झाल्यानंतर हे भाविक मंचरमध्ये निवारा लॉजमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. या वेळी कारमधील एका हौशी व्यक्तीने चालकाची परवानगी न घेता कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. (Latest Pune News)
त्यामुळे कारवरील ताबा सुटून ती लॉजच्या पायर्या उतरून थेट गाळ्याजवळ जाऊन अडकली. घटनेनंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने कार सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आली.