

पीएमपीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी चार बस मार्ग स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडित करण्यात आले आहेत. खंडित केलेल्या या मार्गांमुळे दक्षिण पुणे भागातील काही ठिकाणच्या नागरिकांना थेट स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच, मेट्रोने प्रवास करणार्या प्रवाशांना अधिक वारंवारितेने बस उपलब्ध होणार आहेत.
आता महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक वारंवारीतेने बस उपलब्ध होण्याकरिता पीएमपीने शटल क्र. 13, बस मार्ग क्र. 38, 216, 297 हे मार्ग स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडीत केले आहेत. हा बदल आज शुक्रवारपासून (दि.11) करण्यात येणार आहेत. या बदलानुसार प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
1) मेट्रोशटल क्र. 13 - अप्पर डेपो ते सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर हा बसमार्ग स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडीत करण्यात आला आहे. सुमारे 30 बस फेर्यांमध्ये वाढ करून सरासरी 20 मि. वारंवारीतेने बस या नव्या मार्गावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
2) बस मार्ग क्र. 38 - धनकवडी ते न.ता.वाडी हा बसमार्ग स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडीत करण्यात आला आहे. सुमारे 68 बस फेर्यांमध्ये वाढ करून सरासरी 10 मि. वारंवारीतेने बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
3) बस मार्ग क्र. 216 - भारती विद्यापीठ ते शिवाजीनगर हा बसमार्ग स्वारगेट स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडीत करण्यात आला आहे. सुमारे 32 बसफेर्यांमध्ये वाढ करून सरासरी 15 मि. वारंवारीतेने बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
4) बस मार्ग क्र. 297 - राजेश सोसायटी ते शिवाजीनगर हा बसमार्ग स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत खंडीत करण्यात आला आहे. सुमारे 06 बसफेर्यांमध्ये वाढ करून सरासरी 01 तास 30 मि. वारंवारीतेने बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.