

Bus driver and conductor save heart attack victim
दिवे: हडपसर आगारातून जेजुरी रूट नंबर 210 या बसमध्ये चालक, सहप्रवासी व वाहकाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) घडली.जेजुरीवरून नेहमीप्रमाणे बस हडपसरला निघाली होती. ही बस पवारवाडीजवळ येताच मुंढवा येथील प्रवासी शामराव जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले.
पुढे हा त्रास वाढू लागला. प्रवाशाला चक्कर येऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना त्या वेळी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती शांताराम झेंडे या प्रवाशाने चालक व वाहक यांना सांगितले. तसेच जवळच डॉ. अतुल जाधव यांचे खासगी रुग्णालय असल्याचाही माहिती दिली. (Latest Pune News)
त्यानुसार बसचालक मच्छिंद्र कुंभार व बसवाहक सागर पाटील यांनी तातडीने बस रुग्णालयाकडे नेली. त्यांना काळेवाडी येथील अरुंद रस्ता आणि गणेशोत्सवाच्या गर्दीचा सामना करावा लागला.
रुग्णालयात दाखल करताच डॉ. जाधव यांनीही वेळ न दवडता प्रवाशी शामराव जाधव यांच्यावर उपचार सुरू केले.छातीवर पंपींग करत जाधव यांना शुद्धीवर आणले. प्रवाशी जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. अतुल जाधव यांनी दिली. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.