Crime News : सराफावर गोळीबार करणारा स्थानबद्ध

एमपीडीएखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध
pune news
स्थानबद्धFile Photo
Published on
Updated on

शिरूर : शिरूर शहरात सराफावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तूल जवळ बाळगून गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे करणारा व दहशत माजवणार्‍या सराईत गुंडास एमपीडीएखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध केल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

शरद बन्सी मल्लाव (वय 25, रा. काचीआळी शिरूर) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या शिफारशीवरून पुणे जिल्हाधिकारी या चझऊअ कायद्याखाली केली असून, शिरूर पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वर्षातील ही पहिली धडाकेबाज कारवाई आहे. शिरूर पोलिस ठाण्यात नोंद असलेला शरद बग्शी मल्लाव हा सराईत गुन्हेगार असून, त्याचेविरुद्ध शिरूरसह रांजणगाव पोलिस ठाणे व पाली पोलिस ठाणे (जि. रायगड) हद्दीमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न, गोळीबार करणे अशा प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत. शरद मल्लाव यास कायद्याचा कुठलाही धाक किंवा वचक राहिलेला नव्हता व तो लागोपाठ गुन्हेगारी कृत्ये करीत आहे. त्याला यापूर्वी हद्दपार केले असतानाही त्याने गुन्हे केले असल्याने शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंदळे यांनी त्याचा एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पुणे पोलिस अधीक्षक व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. तो मंजूर करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

सराईत गुन्हेगार शरद बन्सी मल्लाद याच्यावर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून त्यास स्थानबद्ध करण्यासाठी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार महेश बरकर, पोलिस हवालदार मंगेश थिगळे, शिरूरचे पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलिस अमंलदार सचिन भोई, पोलिस हवालदार नावसाहेब जगताप, पोलिस अमंलदार नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखिल रावडे, रवींद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी कामकाज पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news