अंगावर रंग का टाकला? जाब विचारल्याने भाऊ-बहिणीवर कोयत्याने वार

रंग टाकल्याचा जाब विचारल्याने घडला प्रकार
 Pune Crime News
अंगावर रंग का टाकला? जाब विचारल्याने भाऊ-बहिणीवर कोयत्याने वारFile Photo
Published on
Updated on

पुणे: आईने दुकानात पाठविलेल्या अल्पवयीन मुलीने मुलांच्या टोळक्याला रंग टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आईला शिवीगाळ करून 15 वर्षांच्या मुलीवर व अकरा वर्षांच्या तिच्या भावावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रेम विकी ससाणे, अफान शेख, आयान शेख, केतन गाडे, गुड्ड्या, यश पाटील (सर्व रा. यशवंतनगर, येरवडा) यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत यशवंतनगरमध्ये राहणार्‍या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील यशवंतनगरमध्ये एक कुटुंब राहण्यास आहे. त्यांच्या घरात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दि. 14 मार्च रोजी सर्व घरी असताना 17 वर्षांच्या मोठ्या मुलीला किराणा सामान आणण्यासाठी तिच्या आईने घराजवळील दुकानात पाठविले होते.

काही वेळातच घराबाहेर मोठ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर आले. त्या वेळी मुलीला विचारणा केल्यानंतर वस्तीतील प्रेम ससाणे व त्याचे मित्र बाहेर उभे होते. ते काहीही कारण नसताना अंगावर रंग टाकत असताना तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर टोळक्याने तिला शिवीगाळ केली.

याचवेळी टोळक्यातील एकाने 15 वर्षांच्या दुसर्‍या मुलीच्या पायावर कोयत्याने वार केले. तर अकरा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात दगड मारला तसेच हत्याराने मुलाच्या बोटावर मारत गंभीर जखमी केले. या वेळी अकरा वर्षांचा मुलगा चक्कर येऊन खाली पडला. या वेळी मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या बहिणीच्या मुलीलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. या वेळी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news