

Ashok Uike On Hindi Language
पुणे: एकीकडे शाळेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू असताना भाजपचे मंत्री अशोक यांनी मला हिंदी येत नाही म्हणून मी हिंदीत बोलणार नसल्याचे सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विभागाची आढावा बैठक शनिवारी पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उईके बोलत होते .यावेळी आमदार बापू पठारे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
उईके म्हणाले, माझा हिंदीला विरोध नाही. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला आहे. माझी आई अशिक्षित, अज्ञानी होती. तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले आहेत. मला तीच भाषा येते. म्हणत हिंदीत माध्यमांशी बोलणार नसल्याचे सांगितले.