

Pune: बी .जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती ही मूळची राजस्थान येथील रहिवासी असून ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. (Pune Latest News)
मंगळवारी रात्री हॉस्टेलमधील तिच्या खोली समोरील एका मोकळ्या खोलीत तिने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी आणि अधिवास कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, त्यातून ती नैराश्यात होती, हे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण काय, हे स्पष्ट होणे बाकी आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.