Bishnoi Gang : बिष्णोई टोळीचे ‘पुणे कनेक्शन’ ; पुण्याच्या शुभमचा सहभाग

राजस्थानच्या बिष्णोई कॅम्पमध्ये शुभम झाला सामील !
shubham lonkar
शुभम लोणकर Pudhari
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी पुण्यातील एकाने सोशल नेटवर्किंग साइटवर धमकीचा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये अलीकडील काळात तरुणांना भरती करून घेण्यात आले होते. त्यासाठी राजस्थान येथे भरती कॅम्प झाल्याची माहिती समोर आली आहे. या कॅम्पमध्ये शुभम लोणकर सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तेथूनच त्याचा बिश्नोई गँगशी संबंध आला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, ‘मला शोधू नका,’ असे म्हणून सिद्दीकी खून प्रकरणात पोलिसांना पाहिजे असलेला लॉरेस बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर पुण्यातून पसार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून शुभम लोणकरचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी शुभमचा भाऊ प्रवीण याला रविवारी पुण्यातून अटकही केली.

भंगार व्यावसायिकांकडे आरोपींची भेट

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम, शुभम लोणकर, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर हे वारजे भागातील एका भंगार व्यावसायिकाकडे कामाला होते. तेथे त्यांची ओळख झाल्याची माहिती पुढे आली आहे. शुभम लोणकर हा ’एनसीसी’चा विद्यार्थी होता.

बिष्णोई टोळीचे ‘पुणे कनेक्शन’

वारजे भागातील एका तरुणाने लॉरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकाविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. सिद्दीकी प्रकरणात सहभाग असलेल्या एक आरोपी पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news