Bishnoi Gang Firing | व्यावसायिकाच्या गोडाऊनवर बिष्णोई गँगकडून गोळीबार

पन्‍नास कोटींच्या खंडणीची फोनवर मागणी
व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार करताना आरोपी.
व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार करताना आरोपी.
Published on
Updated on

पुणे : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीतील पंटर आरजू बिष्णोई याने पुण्यातील एका लोखंड व्यावसायिकाकडे ५० कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास व्यावसायिकाच्या मंतरवाडी-कात्रज बायपासवरील गोडाऊनच्या गेटवर गोळीबार केला. दरम्यान, गोळीबाराचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे व्यावसायिक फुरसुंगी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर काही वेळातच हा गोळीबार झाला आहे.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप गोळीबार करणारे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी, महंमदवाडी हडपसर येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसुंगी पोलिसांनी आरजू बिष्णोई याच्या विरुद्ध खंडणी, आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे व्यावसायिक असून, त्यांचा लोखंडाचा व्यवसाय आहे. उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या समोर मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर त्यांचे गोडाऊन आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता व्यावसायिक गोडाऊनमध्ये आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका आंतराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉटसॲप कॉल आला. समोरील व्यक्ती हिंदीत बोलत होती.

एक घंटेमे चमत्कार दिखा दिया

व्यावसायिक फुरसुंगी पोलिस ठाण्यात पोहोचले, तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. पोलिसांना ते माहिती देतच होते. तेवढ्यात सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नोकराने फोन करून त्यांना सांगितले की, गोडाऊनवर गोळीबार झाला आहे. परत सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आरजू याने फोन केला. मामाच्या मुलाच्या फोनवर देखील कॉल केला. ‘आता तर तुझ्या गोडाऊनवर गोळी झाडली आहे. त्यानंतर गोळी आत झाडू गोडाऊनच्या रस्त्यात जो कोणी दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडू. कोणालाच सोडणार नाही. कुटुंबातील मुलांनासुद्धा. तू गोडाऊनमधून बाहेर पड. एका तासात तुला आम्ही चमत्कार दाखविला आहे’, असे बोलून फोन कट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news