अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार Pudhari
मंगेश देशमुख
Pune Accident: कुरकुंभ- दौंड रस्त्यावरील मोरेवस्ती याठिकाणी अज्ञात वाहन व दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील युवक ठार झाला. सुरज पासलकर (वय २५, रा. लिंगाळी ता. दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरज पासलकर हा दुचाकीवरून निघाला होता. कुरकुंभ- दौंड रस्त्यावर मोरेवस्ती येथील कॅनलजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहन आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात सुरज पासलकर याला जबर मार लागून तो मृत्युमुखी पडला.

