Pune Accident: शिक्रापूर येथे कंटेनरला धडकून दुचाकीस्वार ठार

कंटेनरचालकाला अटक करण्यात आली.
Pune Accident News
शिक्रापूर येथे कंटेनरला धडकून दुचाकीस्वार ठार pudhari file photo
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे: पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर (ता. शिरूर) येथे कंटेनरला धडकून दुचाकीस्वार आकाश गेजगे (वय) याचा मृत्यू झाला. तर बंडू गोते (वय 50) हे गंभीर जखमी झाले. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी रणजित महेंद्र यादव (वय 25) या कंटेनरचालकाला अटक करण्यात आली.

शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत राजाभाऊ गेजगे (वय 28, रा. करंजेनगर, शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून आकाश गेजगे व गोते हे दुचाकी वरून नगरच्या दिशेने चालले होते.

बजरंगवाडी येथे पुणे बाजूने नगरच्या दिशेने चाललेल्या एका कंटेनरने अचानकपणे पुन्हा पुणे दिशेने वळण घेतल्याने कंटेनरच्या मागील बाजूस दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीवरील आकाशचा मृत्यू झाला, तर गोते गंभीर जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news