Pune Accident | दुचाकीच्या धडकेत देवी भक्त ठार

कुरकुंभ-दौंड रस्त्यावर अपघात
Pune Accident
दुचाकीच्या धडकेत देवी भक्त ठार
Published on
Updated on

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील श्री फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भक्ताचा दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू झाला. कुरकुंभ-दौंड रस्त्यावरील (नर्सरी) रोपवाटीकेसमोर रविवारी (दि. ६) पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाना सुर्यभान जाधव (वय ३९, रा. सरपंचवस्ती दौंड) असे मृताचे नाव आहे. तर रोशन राजेंद्र शेवाळे (वय २४, सध्या रा. बोरावकेनगर दौंड) हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाना जाधव व त्यांचे इतर सहकारी चालत कुरकुंभ-दौंड रस्त्यावरून कुरकुंभच्या श्री फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी पहाटे निघाले होते. रोशन शेवाळे हा दुचाकीवरून कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत कामाला जात होता. यादरम्यान त्याच्या दुचाकीने पायी जाणाऱ्या जाधव यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात जाधव याचा मृत्यू झाला. तर रोशन शेवाळे जखमी झाला असून त्याला दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news