Big Relief for Students : विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 'परीक्षा शुल्क' माफ

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
Exam
Exam Pudhari
Published on
Updated on

पुणे : महसूल आणि वन विभागाने आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे, सर्व महाविद्यालयांची परीक्षा शुल्क माफीची सवलत लागू करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना, अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांसाठी परीक्षा शुल्कमाफीची योजना राबवण्यात येते. सन २०२५मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुके घोषित करून या तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती महसूल व वन विभागाने लागू केल्या आहेत. त्यानुसार या सवलती उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्याचे प्रस्तावित होते.

या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे, सर्व महाविद्यालयांची परीक्षा शुल्कमाफीची सवलत लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहील. त्यासाठी आवश्यकतेनुसार वित्तीय तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही उच्च शिक्षण संचालकांनी करावी, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news