Capsule Drug Addiction: भिगवण परिसराला नशेच्या ‘कॅप्सूल’चा विळखा

तरुणाईचा गोळ्या घेण्यासाठी वन विभागाच्या झाडीचा आसरा
pune news|
भिगवण परिसराला नशेच्या ‘कॅप्सूल’चा विळखाPudhari Photo
Published on
Updated on

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरासह परिसरातील तरुणाई नशेच्या ’कॅप्सूल’मध्ये अडकत चालल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. या गोळीची नशा तरुणांना आकर्षित करीत आहे. नशेच्या गोळीचा झटका घेण्यासाठी ही मुले वनविभागाच्या झाडीचा आसरा घेत असल्याचे समजते.

यापूर्वी भिगवण परिसरात हुक्क्याचे प्रमाण वाढले होते. आता त्याची जागा कॅप्सूल घेत आहे. या नशेच्या गोळीचे रॅकेट व प्रवास मुंबईसह इतर शहरी भागाकडून ग्रामीण भागात सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गोळीला गुन्हेगारांसह अनेक सुशिक्षित घराण्यातील मिसरूड न फुटलेली मुलेही बळी पडली आहेत. या गोळीची नशा केल्यानंतर तोंडाचा कसला वासही येत नाही. त्यामुळे कमी काळात ही गोळी तरुणाईत फेमस झाल्याचे सांगितले जाते.

pune news|
Pune Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त!; शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

ही नशेची गोळी भिगवण व मदनवाडी चौकात मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे. ही गोळी साधारण साठ रुपयांपर्यंत मिळते. पाण्याच्या घोटा बरोबर गोळी घेतली की काहीवेळातच झिंग चढण्यास सुरुवात होते. एकदा का गोळीची चटक लागली की, तिची सवय सुटत नाही. सध्या अनेक तरुण नशा, सुस्ती, धुंदीत रमताना दिसत आहे. तक्रारवाडी व मदनवाडीच्या हद्दीत असलेल्या वन विभागाच्या काटेरी झाडा-झुडपात या गोळ्या सेवन करण्याचा अड्डा बनला आहे. या नशायुक्त गोळीबरोबरच दारूच्या बाटल्यांचा खचदेखील या परिसरात आढळून येतो.

दरम्यान, नशा ही गुन्हेगारीच्या दिशेने जाणारी पहिली पायरी मानली जाते. त्यामुळे आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतात. नशा केल्याने स्मरणशक्ती कमी होणे, चालताना धाप लागणे, भूक मंदावणे, सतत धुंदीत राहणे आदी परिणाम होतात. त्यामुळे येथील नशा वाढवण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

pune news|
Vitamin D Deficiency: चिंताजनक! भारतीयांमध्ये ’ड’ जीवनसत्त्वाची कमतरता

भिगवणमध्ये नशेचे अनेक प्रकार

या भागातील तरुणाई कोणत्याही एकाच नशेत कायम राहत नाही. येथे कधी हुक्का, कधी फुलचंद पान, गांजा, व्हाईटनर, झंडू बाम. त्यात आता नशेच्या गोळीची भर पडली आहे. तसेच इतरही काही साधनांतून नशा करणारी मुले आहेत. वास्तविक या नशेचा हा अंमल आरोग्यासाठी अतिशय धोकादायक मानला आहे. मात्र तरीही तरुणाई यामध्ये गुरफटत व अडकत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news