

पुणे: मुळा नदीपात्रातील वाहतुकीसाठी बंद असलेला भिडे पूल गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच 20 ऑगस्टपर्यंत सुरू केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
डेक्कन परिसर आणि पेठांना जोडणारा नदीपात्रातील भिडे पूल मेट्रोच्या पुलाच्या कामासाठी गेल्या महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे पेठांमधून नदीपात्रातील रस्त्याने थेट डेक्कनला ये-जा करणार्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. (Latest Pune News)
महापालिकेत सोमवारी झालेल्या गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी सुरू असलेली महत्त्वाची कामे मार्गी लावली जातील, असे सांगितले. प्रामुख्याने भिडे पुलाचे कामही दि. 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले.