Baramati Bribe Case: चार लाखांच्या लाच स्वीकारताना बारामतीचे वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात

शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी बारामती एस.टी. स्टँड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
Bribe News
Bribe NewsPudhari
Published on
Updated on

बारामती: थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची लाच मागत त्यातील चार लाख रुपये स्वीकारताना बारामती एमआयडीसी एस.टी. आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अनिल तुकाराम बनकर (वय ५१, रा. पणदरे, ता. बारामती) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी बारामती एस.टी. स्टँड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बारामती बसस्थानकात फर्निचर नूतनीकरणाचे काम घेतले होते. या कामाचे ४८ लाख ६० हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते.

Bribe News
Akshar Wari: सर्वधर्मसमभाव‌ : लोकशाहीचा आत्मा

त्यापैकी ४० लाख रुपये मिळाले असून ८ लाख ६० हजार ४५५ रुपये बाकी होते, तसेच पुढील कामासाठी चार लाख रुपये आणि डिपॉजिटची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी सुरुवातीला पाच लाख रुपयांची, नंतर सहा लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

Bribe News
Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! घाटमाथ्याला आज रेड अलर्ट; २४ जुलैनंतर पाऊस कमी होणार

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपीने तडजोडीअंती चार लाख रुपये तत्काळ स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ६.१९ वाजण्याच्या सुमारास बारामती एस.टी. स्टँडसमोरील रस्त्यावर वाहनात चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news