Baramati Crime: अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार; बारामतीतील धक्कादायक घटना

याप्रकरणी शुभम शंकर भोसले (रा. नागझरे, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचारासह पोस्को व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
molestation
molestationfile photo
Published on
Updated on

बारामती: नात्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची घटना बारामतीत घडली. याप्रकरणी शुभम शंकर भोसले (रा. नागझरे, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचारासह पोस्को व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली. नोव्हेंबर 2025 ते 10 मे 2026 या कालावधीत भिगवण रस्त्यापासून आतमध्ये असलेल्या मोकळ्या शेतात मोटारीमध्ये ही घटना घडली.

molestation
Pashan Lake Pollution Issue: महापालिका प्रशासनाचा अजब कारभार; पाषाण तलावातील जलपर्णी थेट राम नदीत!

शुभम याने नोव्हेंबर 2025मध्ये पीडित फिर्यादीशी मैत्री केली. तिचा मोबाईल क्रमांक घेत मेसेज पाठवले. तिला भेटायला बोलावले. तिने नकार दिला असता ती ज्या महाविद्यालयात शिकते तेथे येत तिला धमक्या दिल्या. तिला बोलायला भाग पाडले, तसेच तिचे फोटो मागवून घेतले.

हे फोटो घरच्यांना पाठवून तुझ्याबद्दल खोटे-नाटे सांगेन, अशी धमकी देत पालखी महामार्गावरील वंजारवाडी पुलाजवळ तिला भेटायला बोलावले. तेथे त्याच्या मोटारीत तिला बसवून मुख्य रस्त्यापासून ही मोटार दोन किलोमीटर आतमध्ये मोकळ्या शेतात नेण्यात आली.

ती विरोध करत असताना तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा 10 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास त्याने पीडितेला फोन केला. तू जर आत मला भेटायला आली नाही तर मी आत्महत्या करेन.

molestation
Saswad News: पुण्यातील मद्यधुंद युवक-युवतीचा झेंडेवाडीत गोंधळ; पोलिसांशी उद्धट वर्तन, गुन्हा दाखल

चिठ्ठी लिहून तुझ्या कुटुंबीयांची नावे त्यात टाकीन, तुझे अख्खे घर कामाला लावीन, अशी धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरून फिर्यादी त्याच्यासोबत गेली. पुन्हा त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news