Baramati News: बारामतीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत साडेपाच हजारांवर खटले निकाली

साडेचार कोटी रुपयांची वसुली
Baramati News
बारामतीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत साडेपाच हजारांवर खटले निकालीPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व व दाखल खटल्यांमध्ये तडजोड होऊन 5615 खटले निकाली निघाले असून, एकूण 4 कोटी 58 लाख 56 हजार 824 रुपयांची वसुली झाली. बारामती जिल्हा न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद खारतुडे यांच्या संयुक्त विद्यमाने हे लोकन्यायालय पार पडले.

या लोकन्यायालयासाठी 6 पॅनेल करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश एच. ए. वाणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय. ए. आर. मरछिया, एन. आर. वानखेडे, ओ. एम. माळी, डी. पी. पुजारी यांनी वकिलांसह पॅनेल प्रमुख म्हणून काम केले. बारामती वकील संघटना अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अनुप चौगुले, अ‍ॅड. हर्षदा जगदाळे, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. मोनिका कोठावळे, अ‍ॅड. श्वेता वणवे, अ‍ॅड. विजय कांबळे यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. (Latest Pune News)

Baramati News
Monsoon 2025: शेतकर्‍यांचे डोळे आता पावसाकडे; वेळेत पाऊस सुरू होणार

विधी सेवा समितीचे समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले. लोकन्यायालयात बँकेच्या वसुलीचे 62 खटले निकाली निघाले. त्यात 2 कोटी 43 लाख 65 हजार 267 रुपयांची वसुली झाली. मोटार अपघातांच्या 10 खटल्यांमध्ये 1 कोटी 17 लाख 70 हजार रुपये नुकसानभरपाई पक्षकारांना मिळाली. बाकी पाणी वसुली, महावितरण वसुली, महसूल वसुली अशी एकूण 4 कोटी 58 लाख 56 हजार 824 रुपयांची वसुली झाली.

राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीमध्ये खटले मिटवल्यास पक्षकारांचा फक्त वेळच वाचत नाही तर लवकर तडजोड झाल्याने मानसिक त्रासदेखील वाचतो.

- व्ही. सी. बर्डे, मुख्य जिल्हा न्यायाधीश, बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news