बारामती विमानतळावर पुन्हा विमान दुर्घटना

Baramati Airport Accident | या सलग अपघातांवरून विमान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
Baramati Airport Accident
Baramati Airport Accident
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असताना बुधवारी (दि.१३) बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान दुर्घटनेची घटना आहे. या सलग अपघातांवरून विमान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

बुधवारी सकाळी बारामती विमानतळ परिसरातील गोजुबावी येथे प्रशिक्षण उड्डाण करत असलेल्या एका लहान विमानाला अपघात झाला. सुदैवाने प्रशिक्षण घेत असलेल्या पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि पायलट सुरक्षित बचावला.

व्हीटी - आरएफवाय नोंदणी क्रमांकाचे हे प्रशिक्षण विमान सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान एकल (सोलो) उड्डाण करत होते. यावेळी विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. ही घटना बारामती विमानतळाच्या ११-२९ धावपट्टीच्या २९ बाजूकडील परिसरात घडली. पायलटने कौशल्याने विमानाची सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थी पायलटला दुखापत झाली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास विमान सुरक्षा आणि नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड बर्ड संस्थेकडे बारामती येथे २२ ते २५ प्रशिक्षण विमाने असून त्यापैकी केवळ पाच विमाने कार्यरत स्थितीत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण विमानांच्या देखभाल आणि कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news