Chandrakant Patil : बांगलादेशींचे संकट दारापर्यंत : चंद्रकांत पाटील

नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना कळविण्याचे आवाहन
Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील Pudhari
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केलेली व्यक्ती बांगलादेशी होती. तुमच्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले, शेजारी राहणारे बांगलादेशी असू शकतात. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे काही आढळल्यास संशयितांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकर नागरिकांना केले.

पुणे पोलिसांनी गुन्ह्यातील कारवाईदरम्यान जप्त केलेला तीन कोटी 84 लाख रुपयांचा ऐवज 300 तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, संभाजी कदम, स्मार्तना पाटील, परिमंडळ एक, परिमंडळ 2 आणि परिमंडळ 3 च्या पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि अमंलदार उपस्थित होते.

पाटील म्हणाले, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. घुसखोरांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे तसेच घुसखोरांना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे-मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. दागिने, मोबाईल चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत देण्यात येतो. याबाबतची प्रक्रिया त्वरित पार पाडण्यासाठी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज एक महिन्याच्या आत तक्रारदारांना परत करण्यात यावा. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज परत करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. याबाबतचे आदेश शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

वाहतूक समस्या सोडविण्यास प्राधान्य

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. अतिक्रमणांवर कारवाई, रस्त्यांची दुरस्ती तसेच वाहतूकविषयक सुधारणेसाठी उपाययोजना केल्याने वाहतूक गतिमान झाली आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरातील खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. कायदा मोडणार्‍या गुन्हेगारांंची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पोलिस दलाला 1 हजार पोलिस होणार उपलब्ध

पुण्यातील लोकसंख्येचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलिस दलातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे पोलिस दलाला येत्या काही महिन्यांत एक हजार पोलिस शिपाई उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news