

B.Pharm Admission Final Merit List 2025
पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलद्वारे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सीईटी सेलने याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
वेळापत्रकानुसार 4 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Latest Pune News)
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी 5 जुलै ते 14 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. 13 जुलैपर्यंत नोंदणी न करणार्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. 16 जुलै रोजी तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जामध्ये झालेल्या दुरुस्त्या सुधारण्यासाठी 17 ते 19 जुलै हा कालावधी दिला जाणार आहे. सर्व तक्रारींचे निवारण झाल्यानंतर 21 जुलै रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.