

रामदास डोंबे
खोर : दौंड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात राजकीय युद्ध पेटणार आहे. या दोन्ही गटांशिवाय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचेही उमेदवारी रिंगणात असल्याने या तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होणार? याकडे तालुक्याचे लक्ष आहे. (Pune Latest News)
भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यातील जुने राजकीय युद्ध नव्या जोमाने रंगणार आहे. तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता या दोन्ही बड्या नेत्यांच्या हालचालींकडे लागले आहे. मागील पंचायत समिती निवडणुकीत एकूण 12 पैकी तब्बल 11 जागा रमेश थोरात यांच्या गटाकडे गेल्या होत्या, तर जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 5 जागाही त्यांच्या खात्यात जमा झाल्या होत्या.
मात्र, या वेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. राहुल कुल यांनी सलग तीनवेळा आमदारकी टिकवून ठेवली असून, दौंड बाजार समितीही आपल्या गटाकडे खेचून आणली आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ही गणिते ते बदलू शकतात का? याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याशिवाय दोन गण आणि एक गट वाढल्याने निवडणुकीतली स्पर्धा अधिक तीव होणार आहे.
या दोन्ही गटांशिवाय राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
खडकी-देऊळगाव राजे गटातून वीरधवल जगदाळे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग््रेासकडून निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर, राहूड्ढखामगाव गटातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.