

Pune Politics: ‘ईव्हीएम’च्या मदतीने देशाला हुकूमशाहीकडे नेणार्या सत्ताधार्याच्या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करणार असून, येत्या काळात ‘ईव्हीएम’ यंत्रणेतील फेरफाराबाबत मोठा गौप्यस्फोट करू, असा इशारा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडीतील नागरिकांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांचा ’मत पत्रिकेवर’ मतदान घेण्याचा लोकशाहीतील अधिकार हिरावून घेतला आहे. परंतु या प्रयोगाची चर्चा संपूर्ण राज्यभरात झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मारकडवाडीतील नागरिकांना पाठिंबा दर्शविला आहे.
अतुल लोंढे यांनी मारकडवाडीला भेट दिल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्चस्थानी असताना जनतेवर विश्वास ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सरकारने उलट जनतेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणे ही घटना जालियनवाला बागच्या घटनेसारखीच गंभीर आहे. याचा आम्ही निषेध करतो. जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही. मारकडवाडीतील जनतेचा लढा देशपातळीवर नेण्यात येईल, असे लोंढे म्हणाले.
सत्ताधारी म्हणत आहेत, त्यांना ओबीसी समाजातून मोठ्याप्रमाणावर मतदान झाले आहे. असे असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदापैकी एकाही ठिकाणी ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व का दिले नाही ? केवळ समाजासमाजात भांडणे लावून सत्ता मिळविण्यासाठीच ओबीसी समाजाचा वापर केला आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी या वेळी