गेली दोन महिन्यापासून ज्या गोष्टीची सर्व मतदारराजा वाट पाहता होता तो ऐतिहासिक क्षणाचा दिवस उद्या उगवणार आहे. दौंड तालुक्यात उद्या कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली गेली आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार आ.राहुल कुल व महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांच्यातील झालेली लढत लक्षवेधी ठरली गेली आहे. या दोन्ही आजी - माजी आमदारांनी दौंड तालुक्या मध्ये अर्ज भरण्यापासून ते शेवटच्या सांगता सभे पर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.उद्याचा दिवस हा कोणत्या उमेदवाराला निर्णायक ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून काही तासातच दौंडचा आमदार कोण होणार याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
आ.राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या दोन्ही गटाच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला असून दोन्ही गटाचे समर्थक आमचा १५ ते २० हजारांच्या मताधिक्याने विजय होईल असे सांगण्यात येत आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का देखील वाढला असून यावर्षी ७३.२० टक्के मतदान झाले असल्याने हा वाढलेला टक्का कोणाची धाकधूक वाढविणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रचाराच्या सभा दोन्ही गटाकडून चांगल्याच गाजल्या गेल्या होत्या. दौंड तालुक्यात ज्या पद्धतीने सन २०१४ साली ७३.३२ टक्के मतदान झाले होते अगदी तेवढेच सन २०२४ ला देखील ७३.२७ टक्के मतदान झाले असल्याने दौंडकर मतदार राजाने नेमकी कोणाची धाकधूक वाढविली आहे हे पाहणे अगदी काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे.
दौंड तालुक्यात कमळ फुलले गेले तर विद्यमान आमदार राहुल कुल हे पुन्हा विजयाची हॅट्रिक पूर्ण करणार.मात्र तुतारी वाजली गेली तर आ.राहुल कुल यांची हँट्रीकची संधी हुकली जावून माजी आमदार रमेश थोरात पुन्हा महाराष्ट्र विधानसभेत आपले पाऊल टाकणार ? आता मतदार राजांचा व दौंडच्या लाडक्या बहिणींचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडला जाणार हे अवघ्या काही तासातच घोषित होणार आहे. त्यामुळे उद्या विद्यमान सत्ताधारी गटाचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांची या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली गेली आहे.