Pune Crime: दारू पिताना वाद; डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून तरुणाचा खून

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?
Pune Crime News
दारू पिताना वाद; डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून तरुणाचा खूनpudhari
Published on
Updated on

पुणे: दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मल्लेश कोळी (वय 32) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बारीश उर्फ बार्‍या खुडे (वय 21), आकाश मानकर (वय 23) यांना अटक करण्यात आली. मल्लेश कोळी आणि आरोपी बारीश खुडे, आकाश मानकर हे तिघेही ओळखीचे आहेत.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंढव्यातील दशक्रिया विधी घाटावर तिघे दारू पित होते. दारू पिताना त्यांच्यात वाद झाला. वादातून दोघांनी मल्लेशला काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. मारहाणीत मल्लेश गंभीर जखमी झाला.

आरोपी तेथून पसार झाले. घाटावर जखमी अवस्थेत पडलेल्या मल्लेशला नागरिकांनी पाहिले. त्यांनी घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर मल्लेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी खुडे आणि मानकर यांना पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गावडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news