

Arabian Sea cyclone
पुणेः अरबी समुद्रात सलग पंधरा दिवसांत दुसरे चक्रीवादळ तयार होत आहे. रविवारी (दि.२६) कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होवून सोमवारी (दि.२७) आणि मंगळवारी (दि.२८) त्याचे महाचक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम ३० ऑक्टोबरपर्यंत वाढला असून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ तयार झाले होते.त्यामुळे राज्यात पाऊस वाढला होता.परतीच्या मान्सूनच्या वेळीच हे चक्रीवादळ आले होते.त्या नंतर रविवारी २६ ऑक्टोबर रोजी दुसरे चक्रीवादळ मध्यपूर्व अरबी समुद्रात वेग घेत आहे.२७ व २८ रोजी त्याचे महाचक्रीवादळात रुपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रामुख्याने आंध्रप्रदेश,कर्नाटक,केरळ किनारपट्टीवर याचा प्रभाव पडू शकतो.महाराष्ट्रात मात्र कमी प्रभाव आहे.राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.