Pimpari : आवारे खून प्रकरणासाठी आणखी एक विशेष पथक; पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची माहिती

file photo
file photo
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे हा फरारच आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आणखी एक पथकाची स्थापना केली आहे. या गुन्ह्याचा तपासासाठी यापूर्वी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), शाम अरुण निगडकर (४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), आदेश विठ्ठल धोत्रे (२८, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (३२, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे अद्याप फरार आहे. वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे मावळ परिसरामध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. काहीजण खुनाच्या घटनेत राजकारण होत असल्याचा आरोप करीत आहे. तर, काहीजण वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून झाल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे लवकर सापडणे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे.

सुलोचना आवारे यांचे लाक्षणिक उपोषण

किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १३) लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर पोलिस आयुक्तांची भेट घेत गुन्ह्याचा तपास जलद व पारदर्शी पद्धतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी केल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासातील निष्कर्ष

बांधकाम साईट समोरीलवर बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानु खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात वाद झाला. यामध्ये किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. या रागातून भानू खळदे याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून १२ मे रोजी दुपारी चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली.

किशोर आवारे प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचा कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, गुन्हे शाखेची दोन पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली असून, एसआयटीला अन्य एका पथकाची जोड देण्यात आली आहे.
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news