Ayush Komkar Case Update: आंदेकरकडे अठरा कोटींची मालमत्ता; पोलिसांच्या तपासातून माहिती उघड

घर व परिसरात सीसीटीव्हीचे जाळे
Ayush Komkar Murder Case Update
आंदेकरकडे अठरा कोटींची मालमत्ता; पोलिसांच्या तपासातून माहिती उघडpudhari
Published on
Updated on

पुणे: टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली असताना बंडू आंदेकर व कुटुंबाची 18 कोटींची मालमत्ता निष्पन्न केली आहे. आंदेकर-गायकवाड टोळीच्या युद्धातून आंदेकर टोळीने 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर या 19 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून केला. खुनानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरसह 16 जणांना अटक केली.

पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या घरी छापा कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, दोन पिस्तूल, 4 कार, 4 दुचाकी तसेच 28 मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड असा 95 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. आंदेकर व कुटुंबातील 37 बँक खाती गोठवून त्यातील 1 कोटी 47 लाखांची रोकड गोठवली आहे. (Latest Pune News)

यादरम्यान, वेगवेगळे तीन गुन्हे आंदेकर टोळीशी संबंधित दाखल झाले आहेत. आंदेकर टोळीची मालमत्ता तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले असून, त्यामध्ये आतापर्यंत 17 कोटी 98 लाख 93 हजार रुपयांची मालमत्त निष्पन्न झाली आहे.

बंडू आंदेकरची फुरसुंगीत 24.5 गुंठे जागा, कोथरूडमध्ये फ्लॅट, दोन दुकाने, तीनमजली घर, नाना पेठेत फ्लॅट, लोहियानगरमध्ये दोन खोल्या, हडपसरमध्ये एक खोली तसेच वृंदावणी वाडेकर हिच्याकडे तीनमजली राहते घर, एक टपरी, साईनाथ झोपडपट्टी हडपसर येथे खोली तसेच शिवम आंदेकर याच्या नावे मुळशीतील अगळांबे गाव येथे 22 गुंठे जागा, कोथरूड व नाना पेठेत फ्लॅट व दुकान, तर शिवराज आंदेकर याचे नाना पेठेत फ्लॅट व सोनाली आंदेकर हिच्याकडे नाना पेठेत दोन दुकाने अशी मालमत्ता निष्पन्न झाली आहे.

त्यासोबतच 16 विकसन करारनामे देखील समोर आले असून, नातेवाईक व हितसंबंधितांच्या नावे असलेल्या मालमत्तेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घर व परिसरात सीसीटीव्हीचे जाळे

बंडू आंदेकर तसेच मुलगी वृंदावणी वाडेकर हिच्या घराच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले होते, या भागात कोण येते आणि जाते याची पाहणी या माध्यमातून केली जात होती. त्याची कंट्रोल रूमदेखील आंदेकरच्या घरात केली होती. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये आंदेकर टोळीतील एकाने सीसीटीव्हीचे फुटेज डिलिट केल्याचे समोर आले आहे, त्यालाही पोलिसांनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news