

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर बुधवार (दि.३०) रोजी अक्षय तृतीया निमित्त चंदन उटीचा वापर करून भगवान पांडुरंगाचा अवतार साकारण्यात आला होता. माऊलींच्या समाधी दर्शनात भाविकांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याने अलंकापुरीतच पंढरपूर सामावल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.भाविकांना यावेळी कैरी पन्हे,डाळ प्रसादाचे वाटप करण्यात आले
यासाठीच सर्व खर्च स्वकाम सेवा मंडळ यांचे वतीने करण्यात आला.देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर,विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील,विश्वस्त ॲड.रोहिणी पवार,प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर,महिलाध्यक्षा आशा तापकीर,सुपरवायझर तुकाराम माने,मनसुख लोढा, सुभाष बोराटे,प्रकाश ठाकूर,आनंद अरबुज,दीपक पडवळ,सोमनाथ काळजे,संभाजी फुगे,संभाजी चौधरी,बाळासाहेब गांधिले,धनाजी गावडे व देवस्थान कर्मचारी,स्वकामचे स्वयंसेवक उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयेला साकारण्यात येणाऱ्या चंदन उटीचा,कैरी पन्हे, डाळ प्रसादाचा व मोगऱ्याच्या फुलांच्या सजावटीचा खर्च स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने करण्यात आला.५० किलो गोपीचंदन उटीचा वापर करण्यात आला.भरजरी पोशाख,आभूषणे वापरण्यात आली.देवस्थानच्या सहकार्यातुन आजची उटी साकारण्यात आली.
सुनील तापकीर,अध्यक्ष,स्वकाम सेवा मंडळ,आळंदी
अक्षय तृतीये निमित्त चंदन उटी बरोबरच माऊलींच्या समाधी मंदिरात स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.या फुलांच्या सुवासाने गाभारा सुवासिक झाला होता.माऊलींच्याच मोगरा फुलला मोगरा फुलला या अभंगाची आठवण या निमित्त येत होती.