खेड आळंदी विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुखांची मनधरणी करण्यात शरद पवारांसह अमोल कोल्हेंना यश आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील अशी लढत होत असताना अतुल देशमुख यांची बंडखोरी निर्णयाक ठरत असल्याने बंडखोरी रोखण्यासाठी खासदार कोल्हेंनी फिल्डिंग लावली.
यामध्ये देशमुखांच्या मनधरणीसाठी थेट शरद पवारांनी फोन केल्याने देशमुखांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. देशमुखांच्या माघारीनंतर खेड आळंदीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यात थेट लढत होणार आहे.