Ambegaon Assault Threat Case: आंबेगावात धक्कादायक प्रकार; धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार

पती व मुलीला जिवे मारण्याची भीती दाखवून मुख्य आरोपीसह दोघा मित्रांकडून अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Woman Assault
Woman AssaultPudhari
Published on
Updated on

पुणे: पती, मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मुख्य आरोपीच्या दोघा मित्रांनी बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

Woman Assault
Pune Airport Flight Operations Normal: पुणे विमानतळावर विमान वाहतूक पूर्ववत

याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघा नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 23 वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुरू दोडमणी (वय 25), मयूर (वय 26), दीपक काटकर (वय 24, सर्व रा. लिपाणेवस्ती, सद्गुरू हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिघेही फरार झाले आहेत. हा प्रकार गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होता.

Woman Assault
Pune Municipal Election Analysis: येरवडा-गांधीनगर प्रभागात १८ वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता

फिर्यादी महिला, तिचे पती त्यांच्या एका लहान मुलीसह राहत आहेत. त्याच परिसरात आरोपीही राहतात. गुरू दोडमणी याने या महिलेच्या घरात शिरून तिचे पती व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

Woman Assault
Pune Curry Leaves Price Hike: कढीपत्त्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

आठ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. घाबरून तिने ही बाब कोणाला सांगितली नाही. त्यानंतर गुरू दोडमणी याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्याचे मित्र मयूर आणि दीपक काटकर यांनी तिच्या घरी येऊन ‌’तुझी बदनामी करेन,‌’ अशी धमकी दिली.

Woman Assault
Vyankoji Khopade Political Journey: कुस्तीपासून नगरसेवकपदापर्यंतचा प्रवास — व्यंकोजी खोपडे

तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शेवटी या महिलेने पतीला आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिघेही नराधम फरार झाले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news