Flower Rate: दर घसरल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत; अवकाळीचा फटका

उत्पादन खर्च वाढला उत्पन्न घटले
Flower Rate
Flower RatePudhari
Published on
Updated on

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, वाळुंजनगर, लाखणगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, सध्या झेंडू फुलांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे कमी झालेले दर आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा आणि सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा फूल उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभाव कोसळल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. आधीच कांद्याचे दर घसरल्याने फुलांमधून तोटा भरून निघेल, अशी आशा होती; परंतु फुलांचे दरही घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Flower Rate
Baramati Electricity: बारामतीत उन्हाळ्यात वीजेचा खेळखंडोबा! ग्रामस्थ हैराण

सध्या झेंडूला प्रतिकिलो केवळ 10 ते 20 रुपये दर मिळत असून, इतर फुलांनाही समाधानकारक भाव मिळत नसल्याचे वाळुंजनगर येथील शेतकरी अर्जुन वाळुंज यांनी सांगितले. दरम्यान, 1 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे झेंडू पिकांवर रोगराई वाढली आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला असून, तो परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी झेंडूची झाडे उपटून टाकली आहेत. वाळुंजनगरचे शेतकरी जयेश वाळुंज यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news