

पुणे : अर्चित खान्देशे, ख्याती कत्रे आणि मनीषा थिरुकोंडा यांना पीवायसी-एचटीबीए 16व्या अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी आहे.
स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत अर्चित खान्देशेने हिमांश हरगुणानीवर 15-13, 14-16, 15-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. आता त्याची विजेतेपदासाठी अद्वैत फेरेविरुद्ध लढत होईल. अद्वैतने उपांत्य फेरीत परस्मय राणेवर 15-12, 16-14 अशी मात केली. यानंतर अर्चितने 13 वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत कृष्णा सावंतसह खेळताना अर्जुन चटर्जी-सिद्धान्त धामा जोडीवर 15-3, 15-7 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत अग््रामांकित ख्याती कत्रेने स्वरा मोरेचे आव्हान 15-9, 15-6 असे सहज परतवून लावले. ख्तातीची विजेतेपदासाठी मनीषा थिरुकोंडाविरुद्ध लढत होईल. महिला एकेरीत अग््रामानांकित अनन्या गाडगीळने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित शिवानी शाहवर 15-6, 15-6 अशी मात केली. अनन्याची विजेतेपदासाठी एस. डाखणेविरुद्ध लढत होईल.