Alandi Silver Palkhi Rath: आळंदीत माउलींच्या सेवेत नवा चांदीचा पालखीरथ! विधिवत पूजनानंतर देवस्थानाला अर्पण

आषाढी वारीपूर्वी भाविकांकडून माउलींच्या चरणी चांदीचा पालखीरथ अर्पण; पूजन सोहळा उत्साहात
Alandi Silver Palkhi Rath
Alandi Silver Palkhi RathPudhari
Published on
Updated on

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पारी वारी पालखी सोहळ्यासाठी नव्याने बनविण्यात आलेल्या चांदीच्या पालखीरथाचे मंगळवारी (दि. ७) विधिवत पूजन व अर्पण सोहळा उत्साहात पार पडला.

Alandi Silver Palkhi Rath
Khed Heavy Rain: खेड तालुक्यात पावसाचा कहर! पाझर तलाव फुटला, पूल वाहून गेले; अनेक गावांचा संपर्क तुटला

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, कृष्णा राजाराम अष्टेकर व कुटुंबीय यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले.

Alandi Silver Palkhi Rath
Swargate Metro Water Leakage: पुण्यात मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

हा चांदीचा रथ कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स या संस्थेतर्फ घडविण्यात आला असून, तो देणगी स्वरूपात माउलींच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. या रथ अर्पणप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, यात्रा कमिटी सभापती पूजा घुंडरे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील व कृष्णा राजाराम अष्टेकर कुटुंबातील राधिका अष्टेकर, अमोल अष्टेकर, अतुल अष्टेकर, विपुल अष्टेकर आदी सदस्य, भाविक, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. रथाच्या पूजेचे पौरोहित्य निखिल प्रसादे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news