.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बारामती: सुपे गावचा प्रारूप विकास आराखडा राबविताना संपादित होणार्या जमिनीला योग्य मोबदला देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आराखडा राबविण्यास विरोध होत आहे. परंतु, नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विकास आराखडा तयार करण्यात येतो.
यामध्ये रस्ते, शाळा, भाजी मंडई, स्मशानभूमी, दफनभूमी, मंदिरे, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, महावितरण केंद्र, दवाखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरकुल योजना, मैदान, क्रीडांगण आदी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता आरक्षण निश्चित करण्यात येते, असेही पवार यांनी सांगितले.
आगामी सन 2046 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून सुपा ग्रामपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त सूचना व हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांना विश्वासात घेऊन प्रारूप आराखडा अंतिम करण्यात येईल. संपादित केलेल्या जमिनीचा नागरिकांना योग्य तो मोबादला देण्यात येईल, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.