

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी श्री जय भवानीमाता पॅनेलकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी (दि. 24) बारामतीत संघवीनगर येथील इम्पिरियल बँक्वेट हॉल येथे पार पडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे मुलाखती घेतील, अशी माहिती पृथ्वीराज जाचक व किरण गुजर यांनी दिली.
हा मुलाखतीचा कार्यक्रम सर्वपक्षीय उमेदवारांसाठी आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत गट क्रमांक 6 गुणवडी, सकाळी 10 ते 11 या वेळेत गट क्रमांक 5 सोनगाव, सकाळी 11 ते 12 या वेळेत गट क्रमांक 1 लासुर्णे, दुपारी 12 ते 1 गट क्रमांक 2 सणसर, दुपारी 2 ते 3 गट क्रमांक 3 उद्धट व दुपारी 3 ते 4 गट क्रमांक 4 अंथुर्णे अशा गटनिहाय मुलाखती पार पडतील. इच्छुकांनी या मुलाखतींसाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहवे, असे आवाहन गुजर यांनी केले आहे.