

पुणे : ‘क्या हुकूम मेरे आका..?’ हा अलाउद्दीनच्या कथेतील जादुई दिवा आपण गोष्टीरूपात इतकी वर्षे ऐकत होतो. मात्र, एआय अॅपच्या माध्यमातून हा जादुई दिवा आता प्रत्येकाच्या हाती आला आहे. चॅट जीपीटी, जेमिनी, को-पायलट यांसारखी तब्बल 10 हजार अॅप उपलब्ध आहेत. या अॅपमुळे उद्योग, शिक्षण, बँकिंग, शेती, आरोग्य, वाहतूकसह अनेक क्षेत्रांचे काम प्रचंड गतिमान झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) आता सर्वच क्षेत्रांत प्रवेश केला असून आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगाने ते तुमचे काम करून देतात. एआयचा जन्म होताच या अॅपची संख्या शेकड्यात होती. आता ती तीन हजारांवरून 10 हजारांच्या पुढे गेली आहे. या पुढची सर्वच कामे आपल्याला एआय अॅपने करावी लागतील, असे चित्र दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, एआय अॅप साधारणपणे पुढील प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जातात...
- चॅटबॉट व व्हर्च्युअल असिस्टंट (उदा. : चॅट जीपीटी, जेमिनी), इमेज व व्हिडीओ जनरेशन, व्हॉईस व भाषांतर, डेटा विश्लेषण व भविष्यवाणी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा व फसवणूक शोधणारे, शैक्षणिक, प्रशिक्षण, आरोग्य व वैद्यकीय निदान.
शिक्षण : विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार अभ्यासक्रम शिकवणारे, ऑनलाईन मार्गदर्शन.
आरोग्य : एक्स-रे व वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण करून रोगांचे लवकर निदान.
शेती : हवामान, माती, पिकांची माहिती तपासून खत-पाण्याचा योग्य वापर सुचविणारे अॅप उपलब्ध.
बँकिंग, वित्त : ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक ओळखणे आणि ग्राहकांना आर्थिक सल्ला देणे शक्य.
उद्योग, उत्पादन : रोबोटिक्स, ऑटोमेशनद्वारे उत्पादन प्रक्रिया वेगवान झाली आहे.
अॅपची नावे अन् उपयोग
चॅट जीपीटी : प्रश्नांची उत्तरे, लेखन, भाषांतर, कोडिंग
गुगल जेमिनी : गुगल सर्च, मॅप्स, जीमेल जनरेशन
क्लाऊड : मोठे डॉक्युमेंट विश्लेषण
मायक्रोसॉफ्ट को-पायलट : ऑफिस कोडिंग, प्रॉडक्टिव्हिटी
परप्लेक्सिटी : संशोधन आणि महिती, लेखन
इमेज डिझाईन : फोटो, पोस्टर, ग्राफिकसाठी
मिडजर्नी : चित्र तयार करणे
डेल ई : फोटो आणि आर्ट तयार करणे
कॅन्व्हा : पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया डिझाईन
रिमूव्ह बीजी : फोटो बॅकग्राऊंड काढणे, व्हिडीओ
रन-वे : व्हिडीओ एडिटिंग
पिक्टोरी : टेक्स्टपासून व्हिडीओ तयार करणे
सिन्थेसिया : एआयद्वारे व्हिडीओ
ग्रामर्ली : ग्रामर (व्याकरण) सुधारणेसाठी
क्वील बोट : वाक्य बदलणे
जॅसपर ः जाहिरात लेखन
ड्युलिंगो : भाषा शिकणे
फोटोमॅथ ः गणित सोडविण्यासाठी