Pune News: बाजार समितीच्या वार्षिक सभेत गैरव्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर

उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना बगल देत घाईगडबडीत सभेचा समारोप प्रशासनाकडून करण्यात आला.
Pune News
बाजार समितीच्या वार्षिक सभेत गैरव्यवहारांचा मुद्दा ऐरणीवरFile Photo
Published on
Updated on

पुणे: यशवंत साखर कारखान्याला बाजार समितीकडून देण्यात येणारी रक्कम, शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनासाठी नसलेली पार्किंगची सुविधा तसेच बाजार समितीतील विविध गैरव्यवहारांचा मुद्दा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलाच चर्चिला गेला. मात्र, उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना बगल देत घाईगडबडीत सभेचा समारोप प्रशासनाकडून करण्यात आला.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी मार्केट यार्डातील हमाल भवनात पार पडली. या वेळी सभापती प्रकाश जगताप, उप-सभापती शशिकांत गायकवाड, माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, गणेश घुले, संतोष नांगरे, नानासाहेब आबनावे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर आदी उपस्थित होते. (Latest Pune News)

Pune News
Pune News: गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांनी ‌‘यशवंत सहकारी साखर कारखान्या‌’च्या जागेचा जो व्यवहार झाला आहे त्यास पणन संचालक व साखर आयुक्तांची परवानगी नाही, तरीही बाजार समितीचे सभापती आणि संचालक कारखान्याकडे पैसे वर्ग करत आहेत. तसेच कारखान्याबाबतचा अर्ज न्यायालयात दाखल असताना चुकीच्या पद्धतीने सभापती आणि संचालक कारखान्याला पैसे देत असल्याचा आरोप केला.

या आरोपानंतर उपस्थित संचालकांनी आरडा-ओरडा करत काळभोर यांना खाली बसविले. काळभोर यांनी शेतकऱ्यांशी संबंधित 23 प्रश्नांचे पत्र बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. त्याबाबतही त्यांनी या वेळी विचारणा केली. मात्र, हे सर्व प्रश्न सर्वसाधारण सभेतले नाहीत. त्यामुळे या प्रश्नांसाठी नंतर भेटा, असे त्यांना सांगण्यात आले.

Pune News
Baramati Dairy Society projects: बारामती दूध संघाकडून लवकरच 2 प्रकल्प; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाजारातील दैनंदिन व्यवहारातील त्रुटी आणि विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित करत होते. याखेरीज, सभेत बाजार घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनीही आपापल्या विभागातील प्रश्न या सभेत मांडले. मात्र, सभापती आणि सचिवांनी कोणत्याही प्रश्नाला ठोस उत्तर न दिल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news